एनसीसी ऑफिसर समाधान पाटील यांची सेकंड ऑफिसरपदी पदोन्नती

अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक व एनसीसी ऑफिसर  समाधान हरी पाटील यांना एनसीसीमध्ये महत्त्वपूर्ण पदोन्नती मिळाली आहे. ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, अमळनेर येथे झालेल्या समारंभात त्यांना एनसीसी थर्ड ऑफिसर पदावरून सेकंड ऑफिसर म्हणून पदोन्नत करण्यात आले.

या प्रसंगी एनसीसी कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे व एनसीसी ॲडमिन ऑफिसर पिनाकी बेनिक यांच्या हस्ते पाटील यांच्या खांद्यावर दोन स्टार लावून पदोन्नती जाहीर करण्यात आली. या वेळी एनसीसीचे एसएम, जेसीओ तसेच पीआय स्टाफ उपस्थित होते. मान्यवरांनी पाटील यांना एनसीसीच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच साने गुरुजी परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान पाटील यांचे स्वागत केले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *