प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

अमळनेर (प्रतिनिधी) श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील सहायक प्राध्यापक विजयकुमार वाघमारे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत समाजकार्य विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी डॉ. सुदाम गोविंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.

पीएच.डी. प्रबंधाची मौखिक परीक्षा (व्हायवा) ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या परीक्षेस प्रा. डॉ. रघुनाथ महाजन यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले, तर प्रा. डॉ. प्रतिभा मिश्रा (बिलासपूर) यांनी बाह्य परीक्षक म्हणून सहभाग नोंदविला. मार्गदर्शक डॉ. सुदाम गोविंद राठोड यांच्या उपस्थितीत ही परीक्षा संपन्न झाली. प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी “लैंगिक कामगार महिलांचे सामाजिक वंचितीकरण आणि सामिलीकरण” या दुर्लक्षित, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनातून समाजातील वंचित घटकांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, डॉ. पी. एस. पाटील, तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, सहकारी, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *