ई-पोस्टर स्पर्धेत वैष्णवी जेठवाची बाजी; अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक

अमळनेर (प्रतिनिधी) एरंडोल (टोळी) येथील डॉ. एन. के. आर. शिरोडे कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे आयोजित ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ ई-पोस्टर स्पर्धेत अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी व स्व. प्रा. र. का. के. ले. कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. वैष्णवी जेठवा हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा. देवेश भावसार यांच्या मार्गदर्शनामुळे यश संपादन करता आले.

“ई-पोस्टर स्पर्धेची घोषणा झाल्यापासून माझ्या मनात संकल्पना स्पष्ट होती, परंतु तिला अंतिम आणि प्रभावी स्वरूप देण्याचे काम प्रा. देवेश भावसार यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले. त्यांनी प्रत्येक लहान सहान तांत्रिक बाबींवर, विषयाच्या मांडणीवर आणि सादरीकरणावर बारीक लक्ष केंद्रित केले. जेव्हा जेव्हा माझा आत्मविश्वास कमी व्हायचा, तेव्हा त्यांचे प्रोत्साहन आणि वेळेवर मिळालेले तांत्रिक मार्गदर्शन माझ्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्यामुळेच मी माझा विषय प्रभावीपणे मांडू शकले आणि हे यश संपादन करू शकले.” विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळाल्यास ते कसे शिखर सर करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. या यशाबद्दल कु. वैष्णवी जेठवा हिचे कौतुक होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन योगेश मुंदडे, प्राचार्य डॉ. धनंजय एम. पाटील, समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. वाघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कु. वैष्णवी जेठवा हिचे विशेष कौतुक करून आगामी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *