लोंढवे येथे विहिरीत उडी मारून एकाची आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथील महेंद्र श्रीराम पाटील (वय ४७) यांनी गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ५ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

गावातील विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मात्र, डॉक्टरांनी महेंद्र श्रीराम पाटील यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *