प्रभाग ७ मधील मुख्य ढेकू रोड रस्त्याच्या कामाला गती; आमदार अनिल दादा पाटील यांची पाहणी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधून जाणारा व अनेक गावांना जोडणारा मुख्य ढेकू-मांडळ रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. अखेर या रस्त्याच्या कामाला गती मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर आमदार अनिल दादा पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढत्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी लोकप्रतिनिधी राजूदादा फाफोरेकर व योगिता ताई कापडणेकर यांच्याकडे मागणी लावून धरली. त्यानंतर दोन्ही लोकप्रतिनिधींनी आमदार अनिल दादा पाटील यांच्याकडे रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत आमदार अनिल दादा पाटील यांनी संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी ठेकेदाराला दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत शास्वती घेतली. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या पाहणीवेळी स्थानिक नागरिकांसह जितेंद्र मनीलाल पवार, निलेश फाफोरेकर, अशोक पाटील, सोनवणे सर, मनीष भावसार, सरपंच सुनील पवार, नितीन पाटील आदी उपस्थित होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांसह परिसरातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *