
मुंबईत काला घोडा परिसरात दिनेश खैरनार यांच्या चित्रांचे प्रदर्शन; लाभ घेण्याचे आवाहन पर्वणी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळकर अशोक लोटन खैरनार (ह. मु. अमळनेर) यांचे चिरंजीव दिनेश अशोक खैरनार यांनी रेखाटलेल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन मुंबईतील काला घोडा परिसरात जेहांगीर आर्ट गॅलरी बाहेरील आर्ट प्लाझा गॅलरी येथे ९ फेब्रुवारी ते दि. १५ फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनाचा लाभ सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत घेता येणार आहे. आपण मुंबईत वास्तव्यास असाल किंवा या कालावधीत मुंबईला जाण्याचा योग येत असेल, तर या कलादालनास अवश्य भेट द्यावी. तसेच आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी व परिचितांना प्रदर्शनाबाबत माहिती देऊन या कलापर्वाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दिनेश खैरनार यांनी काही वर्षांपूर्वी अमळनेर शहरातही भव्य चित्रप्रदर्शन भरवून रसिकांची मने जिंकली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने भरविण्यात आली असून प्रत्येक प्रदर्शनात त्यांच्या साकारलेल्या सुंदर व आशयघन कलाकृतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रदर्शनातून अनेक चित्रांची विक्री होत असून त्यांच्या कलेचा गौरव अधिकाधिक ठिकाणी होत आहे.

Leave a Reply