खानदेशातील पारंपरिक वनस्पतीज्ञानाच्या जतनासाठी प्रताप महाविद्यालयात पोस्टर सादरीकरण कार्यशाळा

अमळनेर (प्रतिनिधी) खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील वनस्पतिशास्त्र विभाग व नवरोजी गोदरेज वनस्पती संशोधन केंद्र, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने  पारंपरिक ज्ञान पोस्टर सादरीकरण कार्यशाळा झाली.

खानदेश परिसरातील पारंपरिक वनस्पतीज्ञानाचे संकलन, संवर्धन व शास्त्रीय दस्तऐवजीकरण करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

कार्यशाळेची सुरुवात श्रीमंत प्रताप शेठजी व पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. ही कार्यशाळा दोन सत्रांत पार पडली. प्रथम सत्रात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सागर दातीर यांनी पोस्टर सादरीकरणाचे महत्त्व विशद केले. खानदेशातील पारंपरिक वनस्पतीज्ञानाचे जतन ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी सादर केलेली पोस्टर भविष्यातील संशोधनासाठी उपयुक्त ठरतील, असे त्यांनी नमूद केले. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव यांनी भूषविले. पारंपरिक ज्ञान व आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

द्वितीय सत्रात पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील अध्यक्षस्थानी होत्या तर डॉ. नलिनी पाटील प्रमुख उपस्थित होत्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत व्यक्त करून त्यांनी सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यशाळेमुळे पारंपरिक ज्ञानाचे जतन व संवर्धन होऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित होत असल्याचे मत प्रा. जयेश साळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खानदेश एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, सचिव प्रा. पराग पाटील, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) समन्वयक डॉ. मुकेश भोळे, कुलसचिव राकेश निळे, लेखापाल देवेंद्र कांबळे, मुख्य लिपिक भटू चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा. जयेश साळवे यांच्यासह प्रा. हर्षाली चौधरी, प्रा. ज्योती पडूळ, प्रा. हर्षदा शिंदे, प्रा. प्रगती पाटील, प्रा. कल्याण लोहार, संदीप बिऱ्हाडे, प्रा. रविंद्र मराठे, मानव सरदार व रेहान मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. जे. पी. पडूळ व आदित्य भंगे यांनी केले.

 

स्पर्धेत विविध गटातील विजेते असे

 

स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान (वनस्पतिशास्त्र) गटात प्रथम पारितोषिक विशाल पाटील व सोपान पाटील (रु. २०००), द्वितीय मृणाली पाटील व वैष्णवी मोरे (रु. १५००), तृतीय मनीषा कुमारी व अर्चना पाटील (रु. १०००) तर उत्तेजनार्थ पारितोषिक मयुरी भिला पाटील यांना देण्यात आले. द्वितीय वर्ष विज्ञान (वनस्पतिशास्त्र) गटात प्रथम पारितोषिक सरिता पाटील (रु. २०००), द्वितीय बेग तन्झिमा कौसर (रु. १५००), तृतीय खान तेहरीम सलीम (रु. १०००) तर उत्तेजनार्थ पारितोषिक मानव सरदार यांना प्रदान करण्यात आले. तृतीय वर्ष विज्ञान (वनस्पतिशास्त्र) गटात प्रथम पारितोषिक भूमिका संदनशिव व विवेक महाजन (रु. २०००), द्वितीय पूनम पाटील व जयश्री देसले (रु. १५००) आणि तृतीय पारितोषिक खुशी दास (रु. १०००) यांना प्रदान करण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *