मंगळग्रह मंदिरात मोफत मोतिबिंदू शिबीरात १२७ रुग्णांची तपासणी, ७१ जण शस्त्रक्रियेसाठी पात्र

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळ ग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) आणि आर. झुणझुणवाला शंकरा नेत्र रुग्णालय (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर येथे मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीर झाले. या शिबिराचा १२७ रुग्णांनी लाभ घेतला असून त्यापैकी ७१ रुग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.

शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोल तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ७१ रुग्णांना मंगळवार, दि. १७ मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून विशेष वाहनाने पनवेल येथील आर. झुणझुणवाला शंकरा नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या शिबिरात डॉ. राहुल चौधरी, भूपेंद्र वाघ, विजय संमेसे, हर्षदा शिंदे, प्राची गायकवाड, योगेश कोळी आणि सागर पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, गणेश शिंदे, प्रमोद पाटील, नितेश बारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, अशा प्रकारचे मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्री मंगळग्रह मंदिर येथे नियमितपणे आयोजित केले जाते. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *