भाजप युवा मोर्चाच्या संघटन विस्ताराला गती; अमळनेरात शहर व ग्रामीण अध्यक्षांची घोषणा

अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या संघटनात्मक विस्ताराला वेग देण्यासाठी अमळनेर येथे खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे संघटनाला नवचैतन्य मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अमळनेर शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी राहुल मगन चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच जानवे मंडळ युवा मोर्चा अध्यक्षपदी हिरालाल आनंदा पाटील, तर पातोडा मंडळ अध्यक्षपदी निखिल रमेश धनगर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटन विस्ताराला अधिक वेग मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. समाजहित, राष्ट्रहित आणि जनकल्याणाच्या कार्यात युवकांनी सक्रिय सहभाग घेत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी भैरवी वाघ पलांडे, डॉ. राधेश्याम चौधरी, जिजाबराव पाटील, राहुल पाटील, योगेश महाजन, व्ही.आर. पाटील, लालचंद सैनानी, महेंद्र पाटील, निवास मोरे, डॉ. अनिल शिंदे, महेशराव पाटील, श्याम अहिरे, भिकेश पाटील, हिरालाल पाटील, विजय राजपूत, भरत परदेशी, तुळशीराम हटकर, बाळू पाटील, श्याम पाटील, संदीप पाटील, राकेश पाटील, राहुल पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील, विजय पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटन बळकट करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *