
अमळनेरात नऊ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; आजोबाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील धरणगाव रस्त्यावरील म्हाडा कॉलनी परिसरात नऊ वर्षांच्या बालिकेचा तिच्या आजोबांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी बालिकेच्या आईने अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आजोबाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७९ आणि पोक्सो कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ३ वाजता ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अल्पवयीन बालिकेशी संबंधित असल्याने पोलिसांकडून प्रकरणाची संवेदनशीलतेने चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Leave a Reply