
संदीप नेरकर यांना भौतिकशास्त्रात पीएच.डी.
अमळनेर (प्रतिनिधी) संदीप काशीनाथ नेरकर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. आयोडाइड, आयोडेट, ऑक्झालेट आणि टार्ट्रेट क्रिस्टल्सच्या संशोधनासाठी त्यांनी प्रबंध सादर केला. त्यांच्या या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, संचालक मंडळ तसेच प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
संदीप काशीनाथ नेरकर यांनी “स्टडी ऑफ आयोडाईड आयोडेट ओक्झालेट अँड टार्टारेट क्रिस्टल्स ऑफ द लिड ग्रोन बाय जेल मेथड” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधनासाठी त्यांना डॉ. अमित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नुकतेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी त्यांना पीएच.डी. पदवीचे अधिसूचनापत्र प्रदान केले. यावेळी डॉ. अमित पाटील, प्रा. आकाश चौधरी आणि प्रा. उन्मेष जाधव उपस्थित होते. संदीप काशीनाथ नेरकर यांच्या या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, संचालक मंडळ तसेच प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply