अमळनेरात 3 मार्च रोजी ‘रंग बरसे’ची धमाल; प्रथमच फोम पार्टीचा मिळणार अनोखा अनुभव

अमळनेर (प्रतिनिधी)  धुलीवंदनानिमित्त 3 मार्च रोजी अमळनेरकरांसाठी रंगतदार ‘रंग बरसे’ उत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले असून, “तुम्ही फक्त या आणि सहभागी होऊन मनमुराद आनंद घ्या,” असे आवाहन आयोजक मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलोपर्स यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘रंग बरसे’ची जय्यत तयारी करण्यात आली असून हा भव्य कार्यक्रम मुंदडा इस्टेट, 300 बंगलोज, गलवाडे रोड, अमळनेर येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत रंगणार आहे. यंदाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अमळनेरात प्रथमच फोम पार्टी आयोजित करण्यात आली आहे. यामुळे रंगांच्या जल्लोषासोबत फोमचा अनोखा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमात मोफत व्हीआयपी एन्ट्री, कौटुंबिक वातावरण, नॉन-स्टॉप म्युझिकसह डीजे इलेव्हन आणि व्ही डीजे एरिएस यांची धम्माल पाहायला मिळणार आहे. तसेच रेन डान्स, ढोल धमाका, ऑर्गनिक कलर, विविध फूड स्टॉल्स आणि लकी ड्रॉ यांसारख्या आकर्षणांचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. उत्सवाच्या आयोजनासाठी मुंदडा इस्टेट परिवार आणि हेलपिंग हँडस ग्रुप यांनीही विशेष सहकार्य केले आहे. शहरातील विविध मंडळे, संस्था, महिला मंडळे, सामाजिक गट आणि मान्यवरांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आले आहे. सर्वांनी सहपरिवार या उत्सवात सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

 

सामाजिक एकात्मतेचा संदेश

 

‘रंग बरसे’ हा केवळ आनंदाचा उत्सव नसून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. या माध्यमातून सर्व स्तरातील महिला-पुरुष, युवक-युवती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन मतभेद विसरून प्रेम आणि आनंदाची देवाणघेवाण करतात. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, सहकुटुंब येणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आजवर एकाही वर्षी कोणतीही अनुचित घटना घडलेली नसून, शहरातील महिला भगिनी व युवती मोठ्या उत्साहात व निर्भय वातावरणात या उत्सवाचा आनंद घेतात. यामुळेच ‘रंग बरसे’ उत्सव हा अमळनेरकरांसाठी प्रेम, एकात्मता आणि आनंदाचे प्रतीक ठरला आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *