
गोहिल नगरात गाईच्या गोठ्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील राजाराम नगरजवळील गोहिल नगरातील रहिवासी अभिमन सोनू शेटे यांनी गाईच्या गोठ्यात पत्री छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अभिमन सोनू शेटे यांनी गाईच्या गोठ्यात पत्री छताला गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नी गोठ्यात गेल्यानंतर निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत अमळनेर पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. अभिमन सोनू शेटे हे चुडामन सोनू शेटे यांचे लहान बंधू, तर प्रशांत शेटे आणि राकेश शेटे यांचे वडील होत.

Leave a Reply