घरात घुसून महिलेचा हात धरून पळून जाण्याचा तगादा, नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी

अमळनेर (प्रतिनिधी)  पती कामावर गेलेला असताना घरात घुसून महिलेचा हात धरत, “तुझ्या नवऱ्याला सोडून दे, आपण पळून जाऊ,” असे सांगून तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याची तसेच “मी काहीही करून टाकेल,” अशी धमकी दिल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मंगरूळ येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राज दयाराम कोळी (वय २१) याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा पती कामानिमित्त घराबाहेर गेला असताना राज दयाराम कोळी हा घरात घुसला. त्याने महिलेचा हात धरून “तुझ्या नवऱ्याला सोडून दे, आपण पळून जाऊ,” असे सांगत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला असता राज दयाराम कोळी याने “मी काहीही करून टाकेल,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महिलेचा पती घरी आला असता त्याने राज दयाराम कोळी याला पत्नीसोबत जबरदस्ती करताना पाहिले. त्यानंतर महिलेचे नातेवाईक तसेच सासरे घटनास्थळी आले. मात्र, त्यांच्या समक्षही राज दयाराम कोळी याने महिलेला “आपण पळून जाऊ, नाहीतर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून राज दयाराम कोळी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७४, ३२९(४), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *