चिमुकल्या यशवीचा वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा; मेहता परिवाराचा अनोखा सामाजिक उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मेहता परिवाराने परिवारातील लाडकी चिमुकली यशवी हिचा वाढदिवस ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली.

वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत मेहता परिवाराने विद्यालयातील विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे केले. यावेळी धवल मेहता, प्रसाद मेहता यांच्यासह संपूर्ण मेहता परिवार सहभागी झाला होता. यशवीची आई, मुंबईस्थित बहीण, पत्नी तसेच परिवारातील इतर नातेवाईकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत वाढदिवसाचा आनंद घेतला. ममता विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी मेहता परिवाराचे आभार मानले. यावेळी कल्पना ठाकूर,  वैशाली राऊळ, सोनाली पवार, हेरंब कुळकर्णी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *