
अमळनेरचे योगेश्वर पाटील यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) सन २०२६-२७ चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आटाळे येथील शिक्षक योगेश्वर भाऊराव पाटील यांना प्रदान करण्यात आला. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार तथा माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगावचे आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. करिश्मा नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, डायटचे प्राचार्य डॉ. झोपे तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त १५ शिक्षक-शिक्षिकांच्या उपस्थितीत योगेश्वर भाऊराव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. योगेश्वर भाऊराव पाटील यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, आटाळे गावचे सरपंच प्रकाश पाटील (सदाबापू), वावडे ग्रामस्थ तसेच तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी यापूर्वी ज्या-ज्या गावांमध्ये सेवा बजावली, त्या गावांतील नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. योगेश्वर भाऊराव पाटील हे वावडे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांचे मोठे बंधू आहेत.

Leave a Reply