
न.प.ची मासिक सभा न घेतल्याने नियमभंग; जबाबदारांवर कारवाईची नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अमळनेर शहर विकास आघाडीच्या ११ नगरसेवकांनी दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेची मार्च महिन्यात होणारी मासिक सर्वसाधारण सभा एक महिना उलटूनही घेण्यात आलेली नसल्याने हा नियमभंग असून जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमळनेर शहर विकास आघाडीच्या ११ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर पालिकेची अखेरची सभा २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. नंतरची सभा ३० दिवसांच्या आत घेणे १९६५ च्या महाराष्ट्र नगरपरिषद,नागरपंचायटी औद्योगिक अधिनियम ४० च्या कलम ५१ ,५२ ,५३ अन्वये अनिवार्य होते. अमळनेर नगरपरिषद मूलभूत सुविधांसाठी, विकासकामांसाठी नागरिक व लोकप्रतिनिधींचे अर्ज आलेले आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी मासिक सभा लोकनियुक्त नगराध्यक्षानी आयोजित करायला पाहिजे होती. मात्र मार्च उलटला तरी सभा घेण्यात आली नाही, म्हणून नियमांचा भंग झाला आहे. म्हणून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहर विकास आघाडीच्या जयश्री अनिल पाटील, स्वप्ना विक्रांत पाटील, कविता विजयसिंग राजपूत , सचिन विभाकर कासार, सचिन बळवंत पाटील, विजय कहारू पाटील, भरत सुरेश ललवाणी, देवेंद्र भानुदास कांबळे, अफसाना मुख्तार खाटीक, प्रवीण गंगाराम पाटील, शोभबाई भिवंसन गढरे आदी नगरसेवकांनी केली आहे.
नागरीहितांचे प्रश्न सोडविण्यापासून नगरपकलिका काढते पळ
एप्रिल महिन्यातील महात्मा जोतिबा फुले जन्मोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अमळनेरची अक्षयतृतीया – संत सखाराम महाराज यात्रा उत्सव आहे. त्याचे नियोजन व शहरातील विविध समस्या, तक्रारी व विकासकामांची मागणी यासाठी दर महिन्याची सर्वसाधारण सभा नगर परिषदेने घेणे आवश्यक आहे. मात्र कायदेशीर शासन आदेश असून सुद्धा सत्ताधारी दर महिन्याची सर्वसाधारणपणे सभा घेत नसून अमळनेरकर नागरिकांचे समस्या, तक्रारी व नगरसेवकांचे नागरीहितांचे प्रश्न सोडविण्यापासून पळ काढीत आहेत.
– विजय पाटील, नगरसेवक, पैलाड

Leave a Reply