अमळनेरात मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे बैठकीत दिले आदेश

अमळनेर (प्रतिनिधी) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमळनेर शहरात संघटनात्मक ताकद वाढवण्याचे आदेश जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले.

या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक स्तरावर संघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले. संघटन बळकट करा, जनतेशी थेट संपर्क वाढवा आणि संघर्षासाठी सज्ज रहा, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले. बैठकीला जळगाव शहर जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगर अध्यक्ष किरण तायडे, उपनगराध्यक्ष बंटी भाऊ, तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर सचिव निलेश भावसार, तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसेकडून अमळनेरात लवकरच मोठे मोर्चे, जनसंपर्क अभियान आणि संघटन विस्ताराचे विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसेकडून जोरदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *