मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात विविध सामाजिक उपक्रम

पाणपोई उद्घाटन, रक्तदान व मोतीबिंदू तपासणी शिबिरासह प्रवाशांना नारळपाणी वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात पाणपोई उद्घाटन, रक्तदान व मोतीबिंदू तपासणी शिबिरासह प्रवाशांना नारळपाणी वाटप करण्यात आले.

 खासदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेत्या भैरवी वाघ यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवित वाढदिवस उत्साहात साजरा केला. मंगळ ग्रह सेवा संस्था व भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडी जिल्हा यांच्या वतीने अमळनेर-चोपडा नाका येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. तसेच मंगळ ग्रह मंदिर परिसरात मोतीबिंदू तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चा अमळनेरतर्फे बस स्थानक परिसरात प्रवाशांना नारळपाणी वाटप करण्यात आले. वाढत्या तापमानात प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच नर्मदा फाउंडेशन येथे रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमांच्या आयोजनासाठी भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन, नर्मदा फाउंडेशनचे डॉ. अनिल शिंदे, भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाविस्कर तसेच भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी राजपूत यांचे सहकार्य लाभल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. यावेळी योगेश महाजन, जिजाबनाना पाटील, लालचंद सैनानी, व्ही. आर. आप्पा पाटील, सुभाष आण्णा चौधरी, डॉ. अनिल शिंदे, हिरालाल पाटील, हरचंद लांडगे, भारती सोनवणे, सुरेश बाविस्कर, भरतसिंग परदेशी, देवा लांडगे, मच्छिंद्र लांडगे, दीपक भोई, दिलीप ठाकूर, सुभाष पाटील, शिवाजी राजपूत, कल्पेश पाटील, राहुल चौधरी, निखिल धनगर, शिवकिरण बोरसे, सुमित राजपूत, यश शहा, शंतनु भावसार, राजेश खरारे, निखिल पाटील, अमोल पाटील, जाकीर मेवाती, उदय साळुंखे, मिलिंद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *