
लीनेसे क्लबतर्फे प्रताप महाविद्यालयच्या लेडीज हॉस्टेलला प्रिंटर भेट; सॅनिटरी पॅडचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये सामाजिक उपक्रमांतर्गत लीनेसे क्लबतर्फे प्रिंटर भेट व विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात समाजसेविका जस्मिन भरुचा यांनी सुमारे १९ हजार ५०० रुपये किमतीचा प्रिंटर हॉस्टेलला भेट दिला. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक कामांसाठी प्रिंटरचा मोठा उपयोग होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासोबतच विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन स्टेशनरीचे चार रिम देखील देण्यात आले.
तसेच उपस्थित सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींच्या आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे अध्यक्ष कविता पारख यांनी सांगितले. या प्रसंगी हॉस्टेलच्या कर्मचारी वर्गासह कविता पारख, जस्मिन भरुचा व परमिंदर कालरा उपस्थित होते. कार्यक्रमाला सुमारे ५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हॉस्टेल प्रशासना व प्रताप महाविद्यालय प्राचार्य व खा. शि. मंडळ संचालक यांच्या कडून या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply