
लीनेस क्लब ऑफतर्फे महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) लीनेस क्लब ऑफ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
या प्रसंगी नगरसेविका कल्पना शर्मा, पोस्ट कर्मचारी भगवती मकवाना, योग शिक्षिका उमा अग्रवाल, डॉ. अर्चना पारख, तसेच हिंगोणा येथील सरपंच राजेश्री पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या या महिलांचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी सक्सेसफुल वरद स्टुडिओच्या संचालिका रश्मी कटारिया यांनाही त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले. तसेच “माँ से बेटी सवाई” या उपक्रमांतर्गत भावेश्री प्रसाद जोशी यांनी संस्कृत विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे पीएचडी प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याचबरोबर त्यांच्या आई, शास्त्रीय संगीत विशारद वर्षा प्रसाद जोशी यांचाही सन्मान करण्यात आला. आई-मुलीच्या या यशामुळे उपस्थितांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमात कविता पारख यांनी महिलांनी आत्मविश्वास, शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करावे, असे मत व्यक्त केले. विविध क्षेत्रात महिलांचे योगदान दिवसेंदिवस वाढत असून समाजाच्या प्रगतीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला लीनेसं क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.

Leave a Reply