
‘एमफुक्टो’ संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची बिनविरोध निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील भरवस येथील रहिवासी प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची ‘एमफुक्टो’ संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (महाराष्ट्र फेडेरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन – MFUCTO) संघटनेची बैठक १ मार्च २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे झाली. या बैठकीत कार्यकारी परिषदेवर प्रा. नितीन बाविस्कर, प्रा. डॉ. सचिन नांद्रे आणि प्रा. एकनाथ नेहते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तर जनरल कौन्सिल वर प्रा. डॉ. अजय पाटील, प्रा. डॉ. शैलेश वाघ, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. डॉ. मोहन पावरा, प्रा. डॉ. महेंद्र पाटील, प्रा. डॉ. महेश गांगुर्डे, प्रा. डॉ. अविनाश निकम आणि प्रा. डॉ. संगीता पिंपरे यांची नियुक्ती करण्यात आली, असून पुढील दोन वर्षासाठी आहे, पुढील दोन वर्षात उच्च शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल होणार असून त्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील ही आव्हाने स्वीकारून कामे करावी लागणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण, प्राध्यापक भरती, नेट सेट प्राध्यापक यांच्या सुप्रीम कोर्टात असलेली केस साठी एम फ़ुक्टोची तयारी, वर्कलोड, जुनी पेन्शन योजना, डी सी पी एस, एम. फिल/पीएच.डी एन्क्रिमेंट, कॅस बेनिफिट अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply