अमळनेरातून इसम बेपत्ता

अमळनेर(प्रतिनिधी )झामी चौक येथील नंदलाल नामदेव जगताप (वय ५२) हे दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता दाढ दुखत असल्याने दवाखान्यात जातो असे सांगून घरून निघाले आणि परत आले नाहीत. सर्वत्र शोध घेऊनही न मिळाल्याने भाऊ प्रकाश जगताप यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

      पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध BNS १४०(३) नुसार गु.र.नं. ५१९/२०२६ दाखल केला आहे.बेपत्ता व्यक्तीचे वर्णन :- उंची ५.७ इंच, सावळा रंग, मध्यम अंग, गोल चेहरा, डाव्या गालावर काळी तीळ, पांढरा शर्ट-काळी पॅन्ट असा आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *