कुलूपबंद घर फोडून २९ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेर(प्रतिनिधी )गावात चोऱ्यांचे सत्र सुरू असताना ॐ शांती नगर, बस स्टँडच्या मागे येथील दोन महिन्यांपासून कुलूपबंद असलेले घर फोडून अज्ञात चोरट्याने २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहवा सुनील तेली करीत आहेत.याबाबत फिर्यादी पुष्पा अरुण अधिकार (वय ५०, रा. ॐ शांती नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या एकट्याच राहतात. मुलगा नोकरीनिमित्त सुरत येथे राहतो. मुलाला नोकरी लागल्याने दि. ०५ ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून त्या मुलासह सुरतला गेल्या होत्या. तेव्हापासून घर बंद होते. दि. ०४ ऑक्टोबर रोजी शेजारी राहणाऱ्या मनिषा भामरे यांनी फोन करून  तुमच्या दाराचे कुलूप उघडे आहे, तुमच्या घरीही चोरी झाली असावी” असे सांगितल्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा अमळनेरला घरी आले. घरात पाहिले असता लोखंडी कपाट व कॉटमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. तपासणीत २५ हजार रुपये रोख व चांदीची लक्ष्मीची मूर्ती  असा एकूण २९,००० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करून चोरी केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *