
श्रीलंकेत होणाऱ्या आशियाई बास्केटबॉल स्पर्धेसाठी अमळनेरच्या सोनल हटकर यांची पंच म्हणून निवड
अमळनेर (प्रतिनिधी) श्रीलंकेतील कोलंबो येथे सुरू असलेल्या १८ वर्षांखालील पुरुष व महिला साबा पात्रता आशियाई बास्केटबॉल स्पर्धेसाठी अमळनेरच्या कु. सोनल वाल्मिक हटकर हिची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्या या निवडीमुळे अमळनेरसह जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. २५ ते २९ मे २०२६ दरम्यान सुगथादासा इनडोअर स्टेडियम, कोलंबो येथे ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. कु. सोनल हटकर ही जैन स्पोर्ट्स अकादमी, जळगावची खेळाडू असून के.सी.ई. सोसायटीच्या व्ही. पी. होळे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ (फिबा) व भारतीय बास्केटबॉल महासंघ यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मुथ्थूकुमार यांच्याकडे नियुक्तीपत्र पाठविण्यात आले. सोनलच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडाधिकारी जगदीश चौधरी, क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, प्रा. यशवंत देसले, रविंद्र धर्माधिकारी, अमळनेर येथील एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूलचे चेअरमन प्रकाश मुंदडा, प्राचार्य लक्ष्मण तसेच क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.

Leave a Reply