
अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटीची निवडणूक बिनविरोध; १३ जागांसाठी ३१ जणांची माघार
अमळनेर (प्रतिनिधी) येथील अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटीच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांसाठी सुमारे ४४ जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र त्यापैकी ३१ जणांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. महाजन यांनी दिली.
सुमारे ८६ वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने “बिना सहकार नाही उद्धार” या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेली ही संस्था बिनविरोध व्हावी आणि निवडणुकीच्या खर्चाचा अनावश्यक भार संस्थेवर पडू नये, यासाठी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिता वाघ तसेच ज्येष्ठ नेते डॉ.अनिल शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीतील प्रा. शाम पवार, प्रा. सुभाष सुकलाल पाटील, संजय पुनाजी पाटील, नीलकंठ पाटील, भास्कर चौधरी, कामराज पाटील, बाळासाहेब पाटील, उमेश काटे, लहू पाटील यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी तसेच नगरसेवक डॉ. डिगंबर महाले पत्रकार जितू ठाकूर यांनी स्वागत केले आहे.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार
सर्वसाधारण प्रवर्ग (८ जागा): जयेशकुमार प्रतापराव काटे (कोळपिंप्री), नंदकिशोर अरुण नेरकर (कन्हेरे), भागवत पंडीत पाटील (पाडळसे), प्रताप आत्माराम पाटील (फाफोरे बु.), प्रफुल्ल भिका पाटील (कोळपिंप्री), पुरुषोत्तम सुभाष पाटील-सूर्यवंशी (कंडारी), शामकांत बळीराम पाटील (गोवर्धन), युवराज आत्माराम पाटील (बोहरा). महिला प्रवर्ग: मंगलाबाई लोटन चौधरी (निंब), सुवर्णा अनिल पाटील-अहिरराव (बोहरा). इतर मागास प्रवर्ग:सुरेश पिरन पाटील (निंभोरा). अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग: हिलाल छन्नू सैंदाणे (निंब). भटक्या विमुक्त प्रवर्ग: ज्ञानेश्वर गरबड धनगर (बोहरा).

Leave a Reply