
लीनेस क्लब’तर्फे ममता विद्यालयातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
अमळनेर (प्रतिनिधी) ममता विद्यालयात ‘लीनेस क्लब’तर्फे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांना चित्रांच्या माध्यमातून व्यक्त केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रेम माळी, द्वितीय क्रमांक कार्तिक पाटील, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस लावण्या शिरसाट यांनी मिळविले. दीपिका परदेशी आणि लावण्या मोरे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना क्लबच्या अध्यक्षा कविता पारेख, सचिव आंचल अग्रवाल, खजिनदार भाग्यश्री मनियार आणि कॅबिनेट ऑफिसर ममता अग्रवाल यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी आंचल अग्रवाल यांनी लीनेस क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धेनंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी लीनेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्पना ठाकूर, वैशाली राऊळ, हेरंब कुलकर्णी, सोनाली पवार आणि नामदेव जाधव यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply