मंगरूळ येथे शनैश्वर जयंतीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास प्रारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथे शनैश्वर जयंतीनिमित्त ९ ते १६ मे दरम्यान अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हभप प्रसाद महाराज, हभप रुपचंद महाराज (औरंगपूर) आणि हभप बबन महाराज पिंपळेसीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत सखाराम माऊली भजनी मंडळाच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा पार पडत आहे.

दररोज सकाळी ५ वाजता काकडा आरती, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ तर रात्री साडे आठ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ मे रोजी हभप श्याम महाराज घोडगावकर यांचे कीर्तन झाले. १० मे रोजी हभप मनोज महाराज, ११ मे रोजी हभप उमेश महाराज औरंगपूर, १२ मे रोजी हभप मयूर महाराज आउटी (आळंदी), १३ मे रोजी हभप शुभम महाराज मंदाणेकर, १४ मे रोजी हभप स्वप्नील महाराज गिरडकर, १५ मे रोजी हभप पांडुरंग महाराज बागुल मालपूरकर आणि १६ मे रोजी हभप पंकज महाराज एकतासकर यांचे कीर्तन होणार आहे. १५ मे रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत पालखी व दिंडी सोहळ्याची नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. तसेच १६ मे रोजी रात्री साडे आठ ते साडे अकरा दरम्यान काल्याचे कीर्तन होणार आहे. मनोहर रामलाल पाटील व लक्ष्मण शंकर पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून १६ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. या कीर्तन सोहळ्यास हभप दिलीप महाराज अकोलेकर, हभप सूरज महाराज आडगावकर, युवराज महाराज पिंपळेकर, बापू गोबजी पाटील, गोकुळ पाटील, प्रकाश पाटील, भटा पाटील, कैलास पाटील, चुडामण पाटील, शरद पाटील, आनंदा पाटील, नंदू पाटील, शरद हिरामण पाटील, विशाल सुभाष पाटील, स्वप्नील पाटील, निलेश पाटील, शशिकांत पाटील व अमोल पाटील हे गायनाचार्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच निंबा आत्माराम पाटील, आधार पाटील व रवींद्र पाटील हे विणेकरी म्हणून, तर दीपक विश्वास पाटील चोपदार आणि विकास रघुनाथ पाटील भालदार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

या सप्ताहासाठी मंगरूळ, अटाळे, पिंपळे, खडके, निसरडी, वाघोदे, लोंढवे, जानवे, शिरूड, कोंढावळ, डांगर, कन्हेरे, फापोरे, सुमठाणे, आर्डी, आनोरे, कावपिंप्री, इंदापिंप्री, गलवाडे, अंबापिंप्री, वडगाव, जवखेडा आणि शिरसाळे येथील भजनी मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *