
अंदरपुरा येथे बालरोग तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर उत्साहात
आधार संस्थेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) आधार संस्था अमळनेर यांच्या वतीने अंदरपुरा मोहल्ला येथील ईलाही मदरसा येथे बालरोग तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर उत्साहात झाले.
डॉ. देवयानी बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिराला परिसरातील नागरिक, महिला व बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, संचालक रेणु प्रसाद तसेच योगिता पाटील, मोहिनी धनगर, तौसिफ शेख, अंदरपुरा भागातील आरोग्य मित्र रईसा बी शेख, विप्रो कंपनीचे वेल्फेअर ऑफिसर सुधीर बडगुजर, दर्शन चौधरी, परिमल पाटील व मनोज तांबट यांच्यासह त्यांची टीम उपस्थित होती. सर्व मान्यवरांचा अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. भारती पाटील, सुधीर बडगुजर, अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टचे अध्यक्ष अफसर पठाण तसेच नगरसेवक नविद शेख यांनी मनोगत व्यक्त करत सामाजिक आरोग्य उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. बालकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी रियाज ठेकेदार, मोना शेख, मजहर शेख, सैय्यद शाकिर अली यांच्यासह परिसरातील महिला व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिप्ती मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन आवास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख यांनी मानले.

Leave a Reply