
अमळनेरात २७ एप्रिलला भव्य गौसन्मान रॅली; गोसंरक्षणासाठी करणार विविध मागण्या
अमळनेर (प्रतिनिधी) गौमातेला तिचा योग्य सन्मान मिळावा या उद्देशाने गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत अमळनेर शहरात रविवारी दिनांक २७ एप्रिल रोजी भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीसाठी शहरात आणि तालुक्यात जय्यत तयारी सुरू असून शेकडो गोसेवक कार्यरत आहेत. विविध ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले असून मंडळे, संस्था, मित्र मंडळे तसेच महिला मंडळांना निमंत्रण देण्यात येत आहे. या रॅलीद्वारे गोहत्या बंदीसाठी देशभर एकच कडक कायदा लागू करावा, गौमातेला राष्ट्रमाता घोषित करावे, केंद्रीय गोसेवा व संरक्षण कायदा लागू करावा, सर्व कत्तलखान्यांचे परवाने रद्द करावेत तसेच स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करावे अशा विविध मागण्या करण्यात येणार आहेत. ही रॅली सकाळी १० वाजता संकटमोचन हनुमान मंदिर, प्रताप मिल कंपाऊंड येथून प्रारंभ होऊन तहसील कार्यालय, अमळनेर येथे समाप्त होणार आहे. गौमातेवर श्रद्धा असलेल्या सर्व हिंदू बांधवांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गौसन्मान आवाहन अभियानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply