अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर; जितेंद्र झाबक व गोविंदा बाविस्कर यांची कार्याध्यक्षपदी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ची जम्बो शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष चेतन देवसिंग राजपूत यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मंजुरीने घोषित केली आहे. या कार्यकारिणीत शहरातील सर्व प्रभागांतील क्रियाशील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

अमळनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक व गोविंदा जयवंतराव बाविस्कर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध पदांवर उपाध्यक्ष, सरचिटणीस, संघटक, चिटणीस व इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विविध सेल व आघाड्यांच्या प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होऊन आगामी राजकीय व सामाजिक उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी

 

शहराध्यक्ष चेतन देवसिंग राजपूत, कार्याध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक, गोविंदा जयवंतराव बाविस्कर, उपाध्यक्ष  विजय सुपडू पाटील, हाजी रफिक तेली, सयाजीराव (बबलू) कापडणेकर, देविदास नाटू महाजन, चंद्रकांत गणपत चौधरी, शांताराम सुदाम महाजन, सरचिटणीस  देविदास लक्ष्मण देसले, मुशीर शेख गयास शेख, संदीप केवलचंद जैन, जुनैद शेख कादर शेख, प्रवीण संताजीराव देशमुख, कोषाध्यक्ष प्रमोद रघुनाथ पाटील, सहकोषाध्यक्ष जितेंद्र रवींद्र मराठे, संघटक दीपक पंडित सोनवणे, संदीप ताराचंद पाटील, गुणवंत सुरेश वाघ, मोहन बन्सीलाल भोई, पंकज वासुदेव वाघ, सहसंघटक सुभाष दिलीपराव देशमुख, चिटणीस जयेश महेशराव पाटील, जितेंद्र अमृत भामरे, जयेश अरविंद पाटील.  कार्यकारिणी सदस्य : पंकज अशोक साळी, रवींद्र पंजवाणी, निलेश उत्तमराव महाजन, राहुल विजय पाटील, शेखर लोटन पाटील, प्रशांत मधुकर बडगुजर, राजा बीतराई, रोशन तोलानी, सुभाष प्रल्हाद भोई, राजेंद्र रामचंद्र संदानशीव, प्रवीण शेखर पाटील, दीपक शांताराम मोरे, सागर संजय वाघ, गणेश तापीराम पाटील आणि संतोष गणेश गुप्ता. कायम निमंत्रित सदस्य म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री अनिल पाटील, तिलोत्तमा रविंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, माजी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, माजी कार्याध्यक्ष विनोद कदम, माजी नगराध्यक्ष भरती नरेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष सालिमोद्दीन उर्फ सलीम टोपी शेख, प्रदेश पदाधिकारी रिता भुपेंद्र बाविस्कर, कामगार नेते एल. टी. पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, जितेंद्र हरिश्चंद्र ठाकुर, शेतकी संघाचे संचालक विक्रांतनाना पाटील, माजी नगरसेवक विवेक पाटील,इब्राहिम खाटीक,राजेश शिवाजीराव पाटील आणि भाईदास महाजन बाळू संतोष पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *