भावेश साळुंखेची जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णझेप; विभागीय स्पर्धेसाठी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भावेश लिलाधर साळुंखे याने डिस्कस थ्रो प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले. या कामगिरीच्या जोरावर त्याची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

९ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ही जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात भावेश लिलाधर साळुंखे याने डिस्कस थ्रोमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. भावेश याला क्रीडाशिक्षक कमलेश मोरे आणि किरण शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *