
ॲड. ललिता पाटील स्कूलचा सीबीएसई बारावी विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल
दक्ष हसवानी अमळनेर व पारोळा विभागात प्रथम; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ॲड. ललिता पाटील स्कूलने सीबीएसई बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत यंदाही १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा विद्यार्थी दक्ष हसवानी याने ९२.२९ टक्के गुण मिळवत अमळनेर–पारोळा विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षीच्या सीबीएसई उच्च माध्यमिक परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत पंचक्रोशीत शाळेचा लौकिक अधिक उंचावला आहे. गुणवत्ता यादीत अजय सुभेदार याने ९०.८० टक्के, आर्यन अहिरराव याने ८९ टक्के, रूही पाटील हिने ८८.२८ टक्के तर नक्षत्रा माळी हिने ८०.८० टक्के गुण मिळवत प्रथम पाचमध्ये स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक पराग पाटील, प्रा. देवेश्री पाटील तसेच प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच शिक्षक व पालकांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply