मंगळग्रह मंदिरात श्रीयंत्रासह महाकाली देवीचा कमला प्रयोग अभिषेक

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी कालभैरवी माता व श्री महाकाली देवी यांच्या मूर्तीवर तसेच श्रीयंत्रावर कमला प्रयोग अभिषेक व अर्चन करण्यात आले. मंत्रोच्चार, विधिवत पूजन आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला भाविकांची उपस्थिती लाभली.

भगवान श्री कालभैरव व माता भैरवी यांच्या सान्निध्यात झालेल्या या धार्मिक यंत्रपूजनाला विशेष महत्त्व आहे. भारतीय उपासना परंपरेत श्रीयंत्र हे आदिशक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, तर देवीतत्त्वाशी संबंधित यंत्रोपासना ऊर्जा, साहस आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानली जाते. या पूजनातून मनःशांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा मिळावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर देवीशक्तीच्या आराधनेसाठी आयोजित या सोहळ्यात महाकाली देवीच्या मूर्तीवर आणि श्रीयंत्रावर कमला प्रयोग अभिषेक व अर्चन हा विशेष धार्मिक विधी पार पडला. पूजाविधी आणि मंत्रोच्चारांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या पूजेचे मानकरी कपिल दलाल व त्यांच्या धर्मपत्नी प्रांजलताई दलाल होते. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, यश जोशी व चंद्रकांत जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात करण्यात आलेल्या मनोहारी सजावटीनेही भाविकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक भाविकांनी सजावटीचे छायाचित्रे आणि चित्रफिती काढल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *