
अमळनेर महावितरण पथकाचा वीज चोरी करणाऱ्यांना शाॅक, ७० जणांवर कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) येथील महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीवरप्रकरणी धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. यात गेल्या महिन्याभरात सुमारे ७० वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यात घरगुती ६५, व्यवसायिक ५ असे एकूण ७० वीज चोर ग्राहकांनी सुमारे ५७७०० युनटची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. त्यात मुखत्वे गलवाडे रोड वरील व्यवसायिक ग्राहकांचा देखील समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, म.रा.वि.वि.कंपनी अमळनेर उपविभाग १ अंतर्गत अमळनेर शहर व परिसरा मधील घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांच्या मीटरची तसेच वायरिंगची तपासणी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी सुरु केली आहे. या धडक मोहिमे करिता कार्यकारी अभियंता धरणगाव विभागाचे निलेश सोनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर उपविभाग – १ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी. एच. नेमाडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून वीजचोरी शोध मोहीम राबविण्यात आली. महावितरणतर्फे यापुढेही वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कार्यवाही चालू राहणार आहे. तरी अधिकृतपणे वीज कनेक्शन घेऊनच वीज वापर करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे

Leave a Reply