
लोंढवे येथील स्व. आबासो एस. एस. पाटील विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवले यश
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथील स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल मेन्स कम मेरीट स्काॅलरशील स्किम(एनएमएमएस) या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले.
या परीक्षेत आशाबाई किरण खैरनार, ऋतुजा भगवान पाटील, गायत्री भटू पाटील, प्रणव नागेश पाटील, दुर्गेश मुकेश पाटील व कल्पेश सुनील खैरनार या विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांना शिक्षक महेश लालचंद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. बी. एस. पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply