अवैध मुरूम वाहतूक करणारा डंपर महसूल पथकाच्या ताब्यात

अमळनेर (प्रतिनिधी) : गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईची धडक मोहीम सुरू केली असून, २० ऑगस्ट रोजी भल्या पहाटे भगवा चौकात अवैध मुरूम वाहतूक करणारा डंपर पकडण्यात आला. प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईनंतर संबंधित डंपर अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

भगवा चौक, अमळनेर येथे महसूल पथकाला अनधिकृतरीत्या गौण खनिज मुरूम वाहतूक करणारा डंपर आढळून आला. पथकाने तत्काळ कारवाई करत डंपर ताब्यात घेतला आणि तो अमळनेर तहसील कार्यालयात जमा केला. गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीप्रकरणी नियमानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणाऱ्या महसूल पथकात नायब तहसीलदार सी. यू. पाटील, मंडळ अधिकारी वावडे पी. एस. पाटील, ग्राम महसूल अधिकारी मांडळ संदीप माळी, ग्राम महसूल अधिकारी शहापूर बिक्रम कदम, ग्राम महसूल अधिकारी कुरे खुर्द अमोल पाटील, ग्राम महसूल अधिकारी बाम्हणे विकेश भोई आणि ग्राम महसूल अधिकारी जैतपीर एम. आर. पाटील यांचा समावेश होता.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *