झाडी येथील श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर येथे १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्र यात्रोत्सव

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील झाडी येथील श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे यंदाचा महाशिवरात्र यात्रा उत्सव दि. १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे “हर हर महादेव, जय ममलेश्वर महादेव” या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमणार आहे.

सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे हे प्राचीन व जागृत देवस्थान असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्र दिनी पहाटे काकड आरती, अभिषेक, रुद्रपाठ, महापूजा तसेच दिवसभर दर्शनाची व्यवस्था राहणार आहे. सायंकाळी हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय होईल. रात्री पालखी सोहळा व महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

यात्रा कालावधीत ग्रामस्थांतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतील. परिसरात लहान मुलांसाठी खेळणी, पारंपरिक दुकाने, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स तसेच ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम भरविण्यात येणार आहेत. मंदिर संस्थान व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान शंकराचे दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *