
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त अमळनेर तालुक्यातील 39 हजार शेतकऱ्यांना शासनाचा दुहेरी आधार- : आमदार अनिल पाटील
नुकसानभरपाई पोटी 19 कोटी 80 लक्ष तर रब्बीत बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10 हजार रुपयांचा लाभ
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सुमारे 39 हजार 541 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी 19 कोटी 80 लक्ष तर मिळालेच परंतु त्यांचा खरीप हंगाम वाया गेला असल्याने रब्बी हंगामात बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10 हजार मंजूर केले आहेत.त्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दुहेरी लाभ तथा आधार दिला असल्याची माहिती माजी मंत्री यथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
माजी मंत्री यथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले की, तालुक्यात गेल्यावर्षी दिनांक 30 व 31 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवाचे मोठे नुकसान झाल्याने आमदार अनिल पाटील यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने तातडीने पंचनामे झाले होते. त्या केलेल्या पंचनामाच्या नंतर आमदारांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर 19 कोटी 80 लाख रुपये रक्कम पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्राप्त झालेली आहे.या सोबतच ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपीटमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी मदत म्हणून बियाणे खरेदी करण्यासाठी हेक्टरी 10 हजार रुपये सुद्धा शासनाने यावेळी मंजूर केले असून शेतकऱ्यांना आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे दुहेरी लाभ मिळाला आहे.यामुळे अमळनेर तालुक्यात शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे
ॲग्रीस्टॉक क्रमांकनुसार रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
सदरच्या 19 कोटी 80 लाखसाठी रकमेसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक नसून शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॉक क्रमांक नुसार ती रक्कम शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॉक नोंदणी करून ग्राममहसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांना द्यावी. जेणेकरून लवकरात लवकर शेतकरी बांधवाच्या खात्यावर रक्कम पडेल. दरम्यान शासनाने वेळोवेळी ॲग्रीस्टॉक क्रमांक काढण्यासाठी जो आग्रह केला त्याचा फायदा शेतकऱ्यांना आज तात्काळ मिळाला असून शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी सुविधा केंद्रावर वारंवार जाण्याची गरज नाही.ॲग्रीस्टॉक क्रमांक काढण्यासाठी अमळनेर तहसीलदार यांनी योग्य ते नियोजन केले त्यामुळेच हा पैसा विना केवायसी शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट ॲग्रीस्टॉक क्रमांक नुसार पडल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगत तहसीलदारांचे अभिनंदन केले आहे.तसेच पीडित शेतकरी बांधवाना दुहेरी लाभ दिल्याबद्दल राज्य शासनातील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply