स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांसाठी आग प्रतिबंधक व अग्निशमन सरावाचे प्रात्यक्षिक

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन विभागाकडून आग प्रतिबंधक व आग विझवण्याच्या सरावाचे प्रात्यक्षिक (डेमोस्ट्रेशन) करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या प्रसंगी शहरातील अग्निशमन विभागाचे प्रमुख गणेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांना आग लागल्यास घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आग विझवण्यासाठी वापरली जाणारी विविध साधने व उपकरणांची सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आग कशी विझवली जाते हे विद्यार्थ्यांना दाखवून दिले. या कार्यक्रमाला अग्निशमन अधिकारी  गणेश गोसावी, वाहनचालक फारुक शेख, जफर पठाण तसेच फायरमन दिनेश बिऱ्हाडे, भिका संदानशिव आणि अजय बिऱ्हाडे उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व माहितीपूर्ण ठरला. हा कार्यक्रम शाळेच्या अध्यक्षा सितीका अग्रवाल तसेच मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून अग्निसुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण ज्ञान आत्मसात केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *