
बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला आयएमए अमळनेरचा कडाडून विरोध; रुग्णहितासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) प्रस्तावित बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अमळनेर शाखेने महाराष्ट्र राज्य आयएमए, सेंट्रल एमएआरडी, एएसएमआय तसेच विविध तज्ज्ञ वैद्यकीय संघटनांच्या राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत बुधवारी प्रांताधिकारी मयूर भांगळे यांना निवेदन सादर केले. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आयएमएच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रस्तावित बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेसंदर्भात अद्याप स्पष्ट कायदेशीर, शैक्षणिक आणि नियामक चौकट उपलब्ध नसल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञ, वैद्यकीय परिषद, कायदेतज्ज्ञ आणि शासन यांच्यात व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र हे दीर्घकालीन शिक्षण, प्रशिक्षण, इंटर्नशिप, पदव्युत्तर शिक्षण आणि सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धीवर आधारित असून रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आवश्यक वैज्ञानिक ज्ञान, प्रशिक्षण आणि कायदेशीर जबाबदारी असणे अत्यावश्यक असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. रुग्णांच्या हिताशी संबंधित कोणताही निर्णय वैज्ञानिक पुरावे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विद्यमान कायदेशीर चौकट लक्षात घेऊनच घेतला जावा. अन्यथा रुग्णांच्या सुरक्षिततेबरोबरच राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासावरही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यव्यापी आंदोलनादरम्यान अमळनेर शाखेमार्फत अत्यावश्यक व आपत्कालीन वैद्यकीय सेवा अखंडित सुरू ठेवण्यात येणार असून गंभीर रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी ग्वाहीही आयएमए अमळनेर शाखेने दिली आहे.
या निवेदनावर आयएमए अमळनेरचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन, खजिनदार डॉ. मयुरी जोशी, डॉ. बि. एस. पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. संदीप जोशी, डॉ. भूषण पाटील, डॉ. रविंद्र कुलकर्णी, डॉ. राहुल मुठे, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. किरण बडगुजर, डॉ. एन. डी. ओसवाल, डॉ. अनिल वाणी, डॉ. सुमित सूर्यवंशी, डॉ. दिनेश पाटील, डॉ. हिरा बाविस्कर, प्राजक्ता बहुगुणे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. बिराज मुठे, डॉ. सच्छिन्द्र हजारे, डॉ. अभिजित बाविस्कर, डॉ. दिनेश महाजन, डॉ. उमाकांत बारी, डॉ. दीपक पाटील, डॉ. अनिल शिंदे, डॉ. मयूर महाजन, डॉ. पंकज महाजन, डॉ. आशिष पाटील, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. जयेश शिंदे, डॉ. प्रियांका शिंदे, डॉ. मनीषा भावे, डॉ. मनीषा पाटील, डॉ. विनोद पाटील, डॉ. बी. आर. बाविस्कर, डॉ. टी. डी. चव्हाण, डॉ. सचिन्द्र हजारे, सचिन भावे, डॉ. जितेंद्र बिरहाडे, डॉ. प्रसाद चेडे, डॉ. स्वप्ना पाटील, डॉ. अनिल हजारे, डॉ. मंजिरी कुलकर्णी, डॉ. सोनल चेडे, डॉ. कौस्तुभ ठाकूर, डॉ. श्रद्धा ठाकूर, डॉ. प्रांजली पाटील, डॉ. अशोक शिंदे, डॉ. प्रकाश तळे, डॉ. उर्वी जोशी, डॉ. पियुष गरुड, डॉ. मनीष चव्हाण, डॉ. संदेश गुजराथी, डॉ. गिरीश गोसावी आणि डॉ. बी. ओ. पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून, मोठ्या संख्येने आयएमएचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply