अमलेश्वर नगर गोळीबार प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल; आरोपीला पहाटे केली अटक

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील अमलेश्वर नगर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात अरुण सुरेश महाजन यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा मित्र भूषण देविदास महाजन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला भल्या पहाटे अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत अरुण महाजन यांचा भाऊ नरेंद्र महाजन यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, अरुण महाजन यांनी २७ तारखेला रात्री सव्वा नऊ वाजता पत्नीला दवाखान्यात नेल्यानंतर तेथून पायी चालत मित्र भूषण महाजन यांच्या घरी गेले होते. काही वेळानंतर भूषण याचा फोन आला व अरुण यांना चक्कर येऊन पडल्याचे सांगण्यात आले. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर उपस्थित लोकांनी अरुण यांना भूषण महाजन याने गोळी मारल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज  हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलीस पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भूषण महाजन यांच्या घराची झडती घेऊन काही नमुने तपासासाठी जप्त केले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत. दरम्यान, या प्रकारचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *