
शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीसाठी नोंदणी केली सुरू
अमळनेर (प्रतिनिधी ) केंद्रसरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे सचिव डॉ. उन्मेष राठोड यांनी केले आहे.
हरभरा काढणीला सुरुवात झाली आहे. बाजारात गावठी हरभराला ४ हजार८०० रुपये प्रति क्विंटल ते ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. मात्र नाफेडने प्रति क्विंटल ५ हजार ८७५ रुपये भाव जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड खरेदीत फायदा होणार आहे. नाफेडने हेक्टरी १४ क्विंटल मर्यादा आहे. ऑनलायीन नोंदणी १ मार्चपासून सुरू होणार असून नोंदणीची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत बाजार समितीत येऊन स्वतः नोंदणी करावी. यासाठी पीक पेरा लावलेला डिजिटल सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि भ्रमणध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतः घरी मोबाईल वरून ई समृद्धी ॲपवर नोंदणी करू शकतात, असे सभापती अशोक पाटील, संचालक मंडळ व सचिव डॉ. राठोड यांनी कळवले आहे.

Leave a Reply