कळमसरे रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तीन प्रेमी युगुलांवर दामिनी पथकाची कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या तीन प्रेमी युगुलांवर मारवड पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने दि. २० रोजी दुपारी १ वाजता कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळमसरे रस्त्यावर तीन प्रेमी युगुल आल्याची माहिती मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दामिनी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल माधुरी शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल सायली वाघमारे, सफौ संजय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सुमित गिरासे यांना गस्तीसाठी पाठवून कारवाईचे निर्देश दिले. दामिनी पथकाला घटनास्थळी तीन तरुण आणि तीन तरुणी संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पथकाने चौकशी केल्यानंतर सहाही जण गोंधळून गेले. चौकशीत संबंधित तरुणी आपल्या पालकांना न सांगता तरुणांसोबत आल्याचे समोर आले. यानंतर दामिनी पथकाने सहाही जणांना सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांच्यासमोर हजर केले. मुलींच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली. त्यानंतर तरुणींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले, तर संबंधित तरुणांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *