अमळनेर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक; २८ एप्रिलला होणार मतदान

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली असून आतापर्यंत चार अर्ज दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे.

अमळनेर तालुक्यातील डांगर बु. येथे वार्ड क्रमांक १ मध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. तसेच चोपडाई येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी एक, वार्ड क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक आणि वार्ड क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक असे अर्ज दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल झाले आहेत.

दरम्यान, चोपडाई व अंतुर्ली-रंजाणे येथे सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. तर मुंगसे, नंदगाव- लडगाव आणि डांगर बु. येथे विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीमुळे संबंधित गावांमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल असून १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. १७ एप्रिल रोजी चिन्हवाटप होणार आहे. मतदान २८ एप्रिल रोजी पार पडणार असून आवश्यक असल्यास २९ एप्रिल रोजी पुनर्मतदान घेण्यात येणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *