जैतपीरची सुपुत्री डॉ. योगिता शिंदे यांची नेत्ररोग पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यशस्वी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर येथील सुपुत्री डॉ. योगिता अशोक शिंदे यांची एम.एस. (नेत्ररोग) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे निवड झाली आहे. त्यांची निवड गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

डॉ. योगिता या  कै.श्री. अशोक अजबसिंग शिंदे (माजी बुकिंग क्लार्क, रेल्वे, अमळनेर) यांची  लाडकी कन्या तसेच किरण अशोक शिंदे (वरिष्ठ फार्मासिस्ट, रेल्वे हॉस्पिटल, अमळनेर) यांची त्या भगिनी होत. डॉ. योगिता शिंदे या जिल्हा रुग्णालय, धुळे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

दिल्ली येथील नीट पिजी (NEET-PG) काऊन्सेलिंग प्रक्रियेद्वारे त्यांनी ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी संपादन केली असून हे यश त्यांच्या अथक परिश्रम, संयम आणि दृढ इच्छाशक्तीचे फलित आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी वडिलांचे स्वप्न साकार करत आई-वडील, भाऊ, वहिनी, कुटुंब, गाव व समाजाचे मस्तक अभिमानाने उंचावले आहे. त्यांचे हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या सुवर्ण यशाबद्दल समस्त राजपूत समाजातर्फे त्यांचे  कौतुक होत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *