
सम्राट गणेशोत्सव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी महेश अमृतकार
अमळनेर (प्रतिनिधी) : पवन चौक येथील सम्राट गणेशोत्सव मित्र मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाची सभा ज्येष्ठ सभासद आबासो अमृत रामभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासह विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
सभेत महेश काशिनाथ अमृतकार यांची मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच रोहन युवराज पाटील आणि यश प्रकाश पाटील यांची उपाध्यक्षपदी, करण सुदाम पाटील यांची सचिवपदी, आशुतोष श्याम पाटील यांची सहसचिवपदी, तर प्रदीप शालिग्राम पाटील यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. मंडळाच्या सदस्यपदी संभाजी पाटील, तुषार पाटील, शितल देशमुख, शेखर मराठे, संदीप काटे, वाल्मीक पाटील, बटू पाटील, भानुदास पाटील, गोकुळ पाटील, अनिश वैद्य, गणेश देशमुख, बापू मराठे आणि छोटू पाटील यांची निवड करण्यात आली. सम्राट गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला अमळनेर शहरात विशेष महत्त्व आहे. मंडळाची श्री गणेशाची देखणी व सुरेख मूर्ती हे दरवर्षीचे विशेष आकर्षण ठरते. तसेच १९८५ पासून मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित सजीव देखावा सादर करण्याची परंपरा जपली जात आहे. यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक व प्रेरणादायी सजीव देखावा सादर करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पवन चौक परिसरातील सम्राट गणेशोत्सव मित्र मंडळाचा देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. नूतन कार्यकारिणीच्या निवडीमुळे मंडळाच्या कार्याला नवी दिशा मिळणार असून, गणेशोत्सव उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply