
जयपूर येथील भव्य फाउंडेशनतर्फे प्रा. रोशन मावळे यांना ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ जाहीर
५ एप्रिल रोजी जयपूर येथे होणाऱ्या सोहळ्यात होणार पुरस्कार वितरण
अमळनेर (प्रतिनिधी) जयपूर येथील भव्य फाउंडेशनतर्फे प्रा. रोशन पन्नालाल मावळे यांची ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या संचालिका डॉ. निशा माथुर व संचालक शैलेन्द्र माथुर यांनी दिली.
प्रा. रोशन मावळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात तसेच संशोधन कार्य आणि राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. जयपूर येथील भव्य फाउंडेशनतर्फे ५ एप्रिल रोजी जयपूर येथे ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ व आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात त्यांना ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी देशभरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित आयएएस व आयपीएस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply