अमळनेरात गुजराथी भाषिकांचे एकत्रिकरण; श्री समस्त गुजराथी समाज मंडळाची स्थापना

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील सर्व गुजराथी भाषिकांना एका संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणत श्री समस्त गुजराथी समाज मंडळाची स्थापना १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी प्रेम रतीलाल शाह यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. समाजातील विविध पंथांच्या प्रतिनिधींना कार्यकारिणीत स्थान देत यापुढे सर्वांनी एकसंघ राहून समाजहिताचे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संस्थेची स्थापना झाल्यानंतर तत्काळ कार्यकारिणी गठीत करण्यात आली. गुजराथी समाजातील विविध पंथांना प्रतिनिधित्व देऊन सामाजिक एकोपा आणि समाजहिताच्या उपक्रमांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

अशी आहे कार्यकारिणी जाहीर

 

अध्यक्ष प्रेम रतीलाल शाह, उपाध्यक्ष नितीनकुमार लहेरचंद शाह, सेक्रेटरी चेतन हसमुखलाल गोसालिया, सहसेक्रेटरी विजय प्रभूदास पटेल, खजिनदार जितेंद्र रमेश जेठवा, सहखजिनदार मनीष जगदीशचंद्र जोशी, संचार मंत्री जितेंन कीर्ती कोठारी यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

तसेच सल्लागार डॉ. रविंनचंद्र जैन, हरीशभाई जैन आणि उदय चदूलाल शाह यांचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यकारी मंडळात सतिशचंद्र सराफ, प्रतीक खंडेरिया, अतुल सोनी, डॉ. संजय शाह, येझदी भरुचा, विक्रम शाह, राजू नांढा, जितू गोहिल, हिमांशू शाह, धवल मेहता, कल्पेश कोठारी आणि प्रकाश भाई शाह यांचा समावेश आहे.

 

विविध पंथांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

 

श्री समस्त गुजराथी समाज मंडळाच्या माध्यमातून अमळनेरातील गुजराथी समाजातील विविध पंथांना एका छताखाली आणण्यात आले आहे. यामध्ये काठियावाडी गुजराथी, श्री स्थानकवासी जैन, शीतलनाथ जैन, पटणी गुजराथी, जय श्री कृष्ण सराफ, गुजराथी ब्राह्मण, श्री कच्छी लोहार, वैष्णव समाज, गुजराथी मोची समाज, श्री भगवान स्वामीनारायण, कडवा पाटीदार, कच्छी लोडाया, खंडेरिया समाज आणि गुजराथी पटेल आदी पंथांचा समावेश आहे.

विविध पंथ आणि समाजघटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा वाढविणे, समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे काम करणे तसेच समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. एकसंघपणे समाजहिताचे कार्य करण्याचा निर्धार मंडळाच्या स्थापनेनिमित्त व्यक्त करण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *