
ज्वारीला ४,०२३ तर मक्याला २,४१० रुपये हमीभाव; अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीत ऑनलाइन नोंदणी
अमळनेर (प्रतिनिधी) खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये उत्पादित होणाऱ्या ज्वारी व मका या भरड धान्यांची शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यासाठी अमळनेर तालुका फ्रुटसेल सहकारी सोसायटी येथे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी २०२६ खरीप हंगामातील ज्वारी अथवा मका पिकाचा पीकपेरा असलेला उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक आणि फार्मर आयडी यांसह आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी स्वतः अमळनेर तालुका फ्रुटसेल सहकारी सोसायटीच्या कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी, असे सोसायटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
ज्वारीला ४,०२३, मक्याला २,४१० रुपये हमीभाव
शासनाने निर्धारित केलेल्या हमीभावानुसार ज्वारीसाठी प्रति क्विंटल ४,०२३ रुपये, तर मक्यासाठी प्रति क्विंटल २,४१० रुपये या दराने खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारभावातील चढ-उताराचा परिणाम न होता शासनाच्या निर्धारित हमीभाव खरेदी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना घेता येणार आहे..तालुक्यात ज्वारी व मका पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत ऑनलाइन नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी करताना पीकपेरा उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी राहू नयेत, याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. कागदपत्रे पूर्ण असल्यास नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शकपणे पूर्ण करता येणार आहे.
पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन नोंदणी
“पात्र शेतकऱ्यांनी २०२६ खरीप ज्वारी व मका पिकपेरा उतारा तसेच आवश्यक ती सर्व कागदपत्रे पूर्णपणे सोबत आणावीत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.”
-भागवत पंडीत पाटील, चेअरमन, अमळनेर तालुका फ्रुटसेल सहकारी सोसायटी

Leave a Reply